काही वर्षापूर्वी इब्राहिम मुल्ला या सॉलीसिटर फर्म ने कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली की त्यांच्या अशीलाचे एस्क्रो अकाउंटचे पैसे सुमारे साठ लाख अफरातफर होउन गहाळ झाले आहेत.नेहेमीच्या प्रथेप्रमाणे त्यांनी पैसे बॅंकेत एफ.डी.मध्ये गुंतवले होते.त्याच्याकडे ज्या पावत्या होत्या त्या खोट्या आहेत असा बँकेचा दावा होता.तो खरा होता. पण चेक तर जमा झाला होता.
तपासाअंती दहा लाख बँकेत बी. पी. जोशी यांच्या खात्यात जमा होउन काढून घेतलेले पोलीसांच्या निदर्शनास आले.बाकी पन्नास लाख भाईदरच्या बॅकेत जमा होउन काढून घेतलेले आढळून आले.
पोलीसांनी तपासांती पाच आरोपींचा पत्ता लावला.जोशी, मेहेता , मिश्रा याना अटक करण्यात आली .
तपास काम जसजसे पुढे गेले तसतसे गहीरे होत गेले .
त्या तपासाची ही कहाणी.

===============================================================
हसून घे .आजचा शेवटचा दिवस. आज ऍरेस्ट पक्की.
उद्या सकाळी पंधरा दिवसाचा रीमांड घेतो. नंतर तू आणि मी. कसा कुटतो बघंच.विरकर फुस्कारला.
तो पर्यन्त थोरात नी एक मेहेतर खाली जाउन आणला होता.
क्या साब अभ्भी न्हाया था. असं पुटपुटत पण काही न बोलता कामाला लागला.
थोड्या वेळाने रुम परत साफ झाली. सगळे आयो आपापल्या जागी येउन बसले. एकीकडे मिश्रा आणि मेहेताच्या ऍरेस्टचे पेपर तयार झाले होते.मिश्रा चे खिसे मोकळे करण्यात आले. पट्टा काढून घेतला.पैशाचं पाकीट ,रुमाल ,शूज काढून घेतले. अंगझडती घेतली.
लॉक अप चा फॉर्म भरला. मेमोची कॉपी बनवली.
मेहेताची झडती घेण्याचा प्रश्न नव्हताच.पण विरकरला मेहेताची काळजी वाटत होती.
याला फिरदोसच्या रुम मध्ये टाक रे.बाबा लोकाबरोबर नको. स्साला सकाळी जिंदा राहणार नाही.
(छोट्या मुलांना वेगळा लॉक अप देतात . पण डेंजरस. ब्लेडच्या पात्यानी रात्री मारामारी करतात.)
मला सारखा एकच धसका . हा मला आत्ता लगेच आत का टाकत नाहीये.
मग डोक्यात प्रकाश पडला. सेशन कोर्टाचा शिपाई अजून आला नव्हता.संदीप बहल आणि अनील सिंग दोघही अँटीसिपेटरी बेल चा अर्ज टाकून बाहेर होते. म्हणजे, कोर्टात टाईट फील्डींग लावून शिपाई वाट बघत बसले असणार. समजा बेल रीजेक्ट झाला तर दोघांना घेउन आज रात्री आमने-सामने.कनफ्रंटेशन शिवाय याची लिंक लागणार नाही. रात्र भारी पडणार.
एव्हाना मिश्रा अणि मेहेता जमा झाले होते.
त्या मेहेताच्या भैणीला बोलाव रे. ती बाहेर गॅलरीतंच उभी असावी.
तेरे भाई को नाश्टा दिया.
हा सर .
मैने भी दिया. कलसे पेटभर खाना देता मै उसको.
तिनं डोळ्याला रुमाल लावला.
माधुरी दिसायला बरीच होती पण आता रडताना आणखी लाल लाल झाली होती.
विरकर आता वेगवेगळ्या अँगलमधून तीचा अंदाज घेत होता.
पैसा किधर रखा है तेरे भाईने?
बाईने आता गळा काढला.
मेरा भाई बेकसूर है साब .
इसको पैचानती क्या तू? माझ्याकडे बोट दाखवलं. हि गूगली होती . हि हो म्हणाली तर माझा आणि मेहेताचा संबंध आहे.
मान हलवून ती नाही म्हणाली.
गूड . पण तेरी भाभी क्युं नही आयी.
वो डिलीवरी मे गयी है साब.
अभी तेरा भाईका डिलीवरी कौन करेगा रे?
आता विरकर ला माधुरी मध्ये .जास्तच इंटरेस्ट आला.
तेरी शादी हो गयी क्या?
डायवोस हो गया.
पण एक गोष्ट माझ्या ध्यानात आली विरकरचं लक्ष विच्यलीत झालंय.
माधुरीकडे बघून तो म्हणाला मेरी वएफ भी गयी डिलीवरी मे.
माधुरी काहीच बोलली नही.
साहेब सि आर ल्याहा की आता.(सि आर म्हणजे क्राईम रीपोर्ट.)
प्रधान साहेब चिवचिवले.
विरकर कान खाजवत माधुरी कडे टक लावून बघत होता. एकदम दचकून त्यानी प्रधान कडे पाहीलं.
मी जरा दूरच उभा होतो.
ए भटा इकडे ये.
हा रिपोर्ट मी लिहीला आहे तो टाइप कर.
ठिक आहे साहेब.
आयला हे मला नव्हतं माहिती . साला दुपारपासून इथेच होता. माझं मॅटर तरी टाइप केलं असतं.प्रधान परत चिवचिवला.
आज प्रधान काही तरी गडबड करणार.माझ्या मनात एक पाल चुकचुकली.काहीतरी करून सात वाजेपर्यंत हा घरी गेला पाह्यजे.
तुमचे पण ठेवा ना साहेब पेपर . अर्ध्या तासात उडवतो.
इब्राहिम मुल्ला मधून चेक उडवले तसे का?.
विरकर मोठ्याने हसला.
प्रधान साहेब , तुम्ही घ्या ना इंटरोगेशन. तोपर्यंत मी जरा ….
एक तरुण वकील आत आला .सर , मी ऍडवोकेट वागळे.
बोला. संदीप बहल आणि अनिल सिंग च्या मॅटर मध्ये..
काय झालं ..एबी मिळाला का?
नाही साहेब .
तारीख पडली.पण नो ऍरेस्ट ची ऑर्डर आहे.
हे पहा वागळे, मला चौकशी साठी दोघही उद्या पाहीजेत.
उद्या नाही , परवा येतील साहेब . वागळे हसला.
विरकर चा पेशंस संपला .
मला उद्या पाहिजेत. सकाळी .
जसा आदेश साहेब.वागळे जवळजवळ पळालाच.
माधुरी चुळबुळत तशीच बसली होती.
प्रधान पेन तोंडात धरून तिच्याकडे बघत बसला होता. विरकर कंटाळला.
मनासारखं काहीच होत नव्हतं बहुतेक.
साडेचार वाजले असावेत. व्हिजीटर यायला लागले होते. लॉकअप ला पाठवलेले शिपाई परत आले.चहावाला आला .
तुम चाय प्येगी?.
नही साब .साब मेरा भाई…
वो ऍरेस्ट मै है. मै चान्स दिया था उसको.कल घर के तलाशी का ऑर्डर लायेगा. किधर रहेता है तुम
वडाळा सर.
घरमे कौन है और?
कोई नही सर.
विरकरने ओठावरून जिभ फिरवली.
तुम जाव अभी. घरमेच रहेना . तुमारा भै को भी लायेगा.
ठिक है साब.
===============================================================
सहा वाजायला आले होते.प्रधान ने फायली गोळा करायला सुरुवात केली होती.त्याचे पेपर मी संपवले होते.
साहेब मी चलू का?
तुम्ही निघा साहेब.
आता सुरुवात. मी मनात म्हटले.
भटा इथे बस .
मी खुर्चीवर बसलो.विरकर नी पट्टा हातात घेतला.
पिठाच्या गिरणीच्या पट्ट्याचा तुकडा .
फटका जोरात बसतो.अट्टल खिलाडी पण तीन फटक्यात संपतात.
महाडीक पाठीकडून पुढे आला. माझं कोपर हातात घट्ट पकडून ठेवलं.
विरकर नी पट्टा जोरात हाणला.डाव्या डोळ्यातून घळकन पाणी आलं.
बोल , तुझ्या खात्यात चेक वटला कसा?
तळहात बधीर झाला होता.
दुसरा फटका. परत तोच प्रश्न.
महाडीक नी खुर्चीला लाथ मारली.
मी तोंडघशी टेबलाच्या कडेवर .दातातून रक्त टपकायला सुरुवात झाली.
मी टेबलाखाली वाकून थुंकलो.तोंडात आंबट चव गोळा झाली.
पाठीवर एक जोरात रट्टा.
पोटाचे पडदे एकदम कडक झाले.ठसका लागला.
हातातून विजेचे लोळ जायला लागले. डोळ्यातलं खारं पाणी, रक्त तोंडात जाउन मळमळायला लागलं.
मा****द,चेक आला कुठून ?
मनोरमा शेट्टी च्या खात्यातून .कर्ज घेतलं होत.
त्या रांडेच्या खात्यात चेक कसा आला.
मला माहीती नाही.
एक फायनल ऍसाल्ट.
अंदाज चुकला.
पोटात बसणारा गुद्दा छाती पोटाच्या मध्येच बसला.
वरचा श्वास वरचं राह्यला.
डोळ्यापुढे अंधारलं.
लाल लाल चांदण्या दिसल्या.
पुढे काही कळलंच नाही.
===============================================================
परत डोळे उघडले तेव्हा डोळ्यासमोर पंखा दिसला.
परत लाल चांदण्या.कपडे गच्च ओले.
हात बर्फामध्ये.महाडीक चा चेहेरा दिसला.
विरकरचा आवाज येत होता.
नाही साहेब . फटका चुकून बसला.
नाही साहेब.ऍरेस्ट मेमो नाही लिहीला. परत शांतता.
हो सर.
जयहिंद .
किती वेळ गेला माहिती नाही.
अचानक सगळं काही फोकस मध्ये आलं.
साहेब ,जागा झाला.इकडे या.
कोणीतरी पाठीखाली हात घालून उठवलं.
विरकर समोर उभा होता.
चेहेरा घामानी थबथबला होता.
पाण्याचा पेला घेउन पुढे आला.
पाणी…..
नको…
पाठीतली कळ थांबतच नव्हती.
हातातली बर्फाची पिशवी गळून पडली.
दुसरा शिपाई पुढे आला.
मी ओळखलं. जनरल ब्रँचचा शिर्के.
मसाज वाला.
त्यानी माझा शर्ट वर केला.
बेंबीच्या वर काहीतरी चोळायला सुरुवात केली.
परत मोबाईल वाजला.
सर, होय सर, शुद्धीवर आला सर .
नाही सर.
उलटी नाही सर .
होय सर. बघतो सर.
ऍरेस्ट करावं लागेल सर.
होम मधून फोन होता सर.
ठीक आहे सर.
जयहिंद.
खालून मानेला पण बोलाव रे.विरकरचा आवाज कापत होता.
साडेआठ वाजले होते.
कष्टाने मी उठून बसलो.
महाडीक गप्प उभा होता.
मी टेबलवरून उतरलो.
खुर्चीत बसलो.
विरकर पुढे आला. काय बोलायचं हे त्याला सुचेना.
मी मंद हसलो.
त्याचा चेहेरा उजळला.
भटा, आज नोकरी घालवली असती माझी.
मी काय ख्वाजा युनुस वाटलो का?
(मार जनरल ब्रँचचा पडला होता एकदा.)
खोलीतलं वातावरण थोडं मोकळं झालं.
चहा ?
नको.
मी महाडीकला खूण केली.
माझ्या बॅगेतून हायफिनॅकची गोळी काढली.
एका घोटात खाली घातली.
थोड्या वेळानी स्पॅझम कमी झाले.
मी उठून लादीवर आडवा झालो.
नउ चे ठोके वाजले.
===============================================================
दहाच्या ठोक्याला मी परत उठून बसलो.
विरकर समोर जाउन बसलो.
करा ऍरेस्ट साहेब.ठीक आहे आता.
क्षणभर विरकर गलबलला.
सॉरी , भटा फटका चूकून बसला.
आज हवं तर लॉकअप मध्ये टाकत नाही.
आता त्याचा चेहेरा मला लहान मुलासारखा दिसायला लागला.
मी मंद हसलो.
चलता है.आटपा लवकर.
मला मेहेताची आठवण झाली.साला आत रडत असेल.मिश्रा घोरत असेल.
मेमो लिहून तयार होताच.
साडेदहा वाजता दोन शिपायांबरोबर मी लॉकअप कडे चालायला लागलो

पिसि .जेसि .आणि आउट

सप्टेंबर 7, 2008

ह्या ष्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी थोडीशी माहिती.
पिसि म्हणजे पोलिस कस्टडी. जेसि म्हणजे ज्युडीशिअल कस्टडी. आउट म्हणजे जामिनावर सुटका.
आय .ओ.म्हणजे चौकशी अधिकारी. पो. नि. म्हणजे आयो शिवाय इतर पोलीस इन्स्पेक्टर.
बाकीची माहिती कथेच्या ओघात येईलंच. बँक फ्रॉड एखाद्या शेअर च्या इश्यु सारखा अंडरराईट होतो.अंडररायटर कोण हे फक्त फ्रॉड उघडकीला आला तरच कळतं कारण सेटलमेंट तोच करू शकतो.आयो सुध्दा सुरुवातीला ह्या प्रश्नाला हात घालत नाही. कारण त्याला तो कधीच पकडू शकत नाही.मॅटर कोणी वाजवली हे तपासाच्या अंतीम टप्प्यात कळतं.तो पर्यन्त आयोची तुंबडी भरलेली असते. एकदा केस बनली की त्याचं काम संपलं. पिसि संपली की आरोपी आणि आयो मित्र.
तपासाच्या दरम्यान सगळ्यांना अटक होते असं काही नाही . गुन्हा दाखल करण्यासाठी लॉजीकली ज्यांना ऍरेस्टकरायला पाहिजे त्यांनांच होते.बाकी बाजार बुणगे बाहेरचं राहतात.आता एवढंच पूरे. नाही तर फार कंटाळवाणं होईल.
—————————————————————————————————
बारा जानेवारी २००२ ला संध्याकाळी साडेचार वाजता सरतेशेवटी मला अटक झाली. महिनाभर माझी आणि मेहता, मिश्रा यांची कसून चौकशी चालली होती. चार वाजता विरकर ऍडीशनल सि.पि .ला भेटून परत आले आणि आम्हाला बोलावलं.
देखो मेहता तेरेको पैला चांस.
एफडी रिसिट कौन बनाया?
मेरेकु नही मालूम. हू तो वरली मा छू.मेहेताचे वाक्य संपायच्या आत मेहेताच्या दोन्ही कानाखाली आवाज.
दोन मिंट शांतता. टायपिस्ट मध्येचं थांबले .मेन रोडच्या रहदारीचा आवाज.बाकीचे आयो बोलायचे थांबले.
दहा सेकंदानी मेहेताचा रडण्याचा आवाज. अमावस्येला कुत्रं रडत तशा भेसूर आवाजात.
(जोशी साब अपना नंबर है आज.मिश्रा माझ्या कानात कुजबुजला.)
मेहेता परत विरकर च्या समोर बसला.
महाडीक वाटंच पहात होता. त्यानी मेहेताच्या पाठीत एक जोरात रट्टा हाणला.
मेहेता दोन टेबलाच्या गॅप मध्ये.
विरकरनी पाण्याचा ग्लास त्याच्या तोंडावर ओतला.
मेहेताचा आवाज अजून भेसूर झाला.
तो परत उठून खुर्चीवर बसणार तेवढ्यात विरकरनी खुर्ची वर लाथ मारली.
निचे बैठ गांडू.मेहेता जेमतेम त्या फटीत मावला.
विरकरनी एकदा कपाळावरचा घाम पुसला.महाडीकला सांगीतलं
पट्टा काढा महाडीक…
कपाटातून महाडीकनं पट्टा काढला.
(ये जीतना मार खायेगा उतना अपनेको कम पडेगा)
इसकी भैन आयी क्या आज?
नही साहेब.
फिर रहेने दे .
ती आल्यावर तिच्यासमोर मारतो साल्याला.
काय रावसाहेब , ऍडीशनल नी दिला काय आज?(बांबू)
समोरच्या टेबलवरून प्रधान साहेबांनी तेल घातलं.ही केस त्याला हवी होती खरं म्हणजे पण विरकर स्वताकडे केस मार्क करून घेण्यात हुशार.प्रधानला बार असोसिएशनची भुक्कड केस मिळाली होती.
बँक फ्रॉड मध्ये आरोपी गब्बर .थर्ड डीग्री जास्त वापरावी लागत नाही. आरोपी पेक्षा नातेवाईकांवर प्रेशर घालायचं. चारी बाजूनी कमाई.जोडीला एखादी नवी बाई.पण आर्थिक घोटाळे समजण्याची अक्कल पाहिजे.आणि अफरातफरीचे नेहेमीचे यशस्वी कलाकार माहिती हवेत.गणित साधंसोप असतंय.दोन तीन कारकूनांना मॅनेजर सोबत घेउन यायचं. त्यातल्यात्यात नाजूक जो दिसेल त्याला आधी फटकवायचा.मॅनेजरवर चार चौघात चढायचं.सहा सात तास बसवून ठेवायचं.घरून मोबाइलवर फोन यायला सुरुवात झाली कि फोन हिसकून आपणंच बोलायंच. तोपर्यंत सगळ्यांना मुतायला लागते. दुसर्‍या दिवशी बँकेच्या दोन बायकांना पंधरा विस मिनीटं या शो मध्ये बोलवायचं. तिसर्‍या दिवशी पासून कमाई चालू.पांढरपेशा समाजातले लोक वकीलाला घेउन येत नाहीत. कमीपणा समजतात.अडाणी आरोपीचा वकिल त्याच्या आधी पोलिस स्टेशनला येउन सेटींग लावतो.टॅरीफ ठरलेलं असतंय.महिन्याभराच्या सरावामुळे माझ्या घरून कोणी नाही आलं तरी चालणार होतं
माणसांची गरज अटक झाल्यावर लागते. आत केलेला पैसा तेव्हा कामाला येतो.थर्ड डीग्री पडत नाही. आत केलेला माल पचवता येतो. थोडीशी रिकव्हरी द्यावी लागते पण ठिक आहे . सिनीयर पासून सगळ्यांना बघाव लागतं . वो भी ठिक है. पुढच्या मॅटरचा इन्शुरन्स प्रिमीयम .आयो ची बदली झाली की आणखी एक एरिया आपला.
महिन्याभराच्या काळात सगळ्या युनीटची नाव पाठ झाली होती
—————————————————————————————————
त्या भय्याला घे रे आत .
(मेरा नंबर लगा जोशीसाब.)
मिश्रा उठला.हात जोडून विरकर समोर उभा राहिला.
थोबाडीत मारायची तर त्यांना जागेवरून उठावं लागेल असा उभा राहिला.
तू कल रात घर गया था?
हां साब .
*****किधर सोया था?
साब दहिसर गया था.
कौन से बार मे.
इस टेन्शन में क्या घर और क्या बार साब.(मॅटर फुटल्यानंतर मिश्रा घरी गेलाचं नव्हता.)
विरकर जागचा उठला.मिश्रा दोन पावलं मागे सरकला.महाडीक मागे उभाचं होता . त्यानी मिश्राला पुढे ढकललं. मिश्रा विरकरच्या
टप्प्यात आला. फाड्कन आवाज आला. मिश्रा भुईसपाट. ओठ फाटला. रक्त गळायला लागलं.बाहीला रक्त पुसत परत हात जोडून उभा राहीला.
आय**** चा बाप आज हेबिअस कॉर्पस फाइल करून आला.
ऍडीशनल सिपि चढला माझ्यावर आज.
आता विरकर कळवळायला लागला.खूप झालं जमा करा भ***ना.
इतका वेळ माझ्याकडे लक्ष नसलेलं आता पूर्ण माझ्याकडे फोकस झालं होतं.
भटा , तुझी आज वाजवतो.
मी काहीचं बोललो नाही. फक्त नाक दाबून उभा राहीलो. मिश्रा बाजूला उकिडवा बसला होता. तोही उभा राहीला.
साब , त्यानी मेहेताकडे बोट दाखवलं.
मेहेता मुताचा थारोळ्यात बसून होता.
पुढची दहा मिनीटं गतीमान हालचालीत गेली. थोरात मेहेताला बाथरूम मध्ये घेउन गेला.भयंकर ढगळ हाफ चड्डी घालून तो परत आला.
माधुरी , मेहेताची बहिण ठेपला ने चा घेउन आली. विरकर खूश होउन एसिपी साहेबांच्या केबीन मध्ये गेला.
मेहेता आणि मिश्रा दोघांची ऍरेस्ट मेमो रायटर लिहायला सुरुवात केली.
मिश्रा माझ्या बाजूला येउन बसला होता. अचानक खूश होउन म्हणाला
चलो जोशी साब मेरी छुट्टी शुरु.
एक बार पिसि हो गयी तो समझो मॅटर खतम .
ये साला अब और नही मार सकता. दो दो दिन बाद मेडिकल लिखानी पडेगी.
आपको लास्ट अंदर करेगा .
मै मेरा दे देगा. लेकीन आप जादा ढिल नही देना सालेको.
हां माधुरी को बोलना आज नही . कल.
मला सगळं सम़जलं.
आता फक्त पंधरा दिवस.
मी परत एकदा हसलो. विरकर समोर उभा होता.

अगोचर

सप्टेंबर 4, 2008

रात्र कशी धावपळीत गेली हे न्युरोच्या टीम ला सकाळपर्यंत कळलं नाही.कॉल पाठवल्यावर गायनॅकची सिनीयर डोळे चोळत आली.पै आणि नाईक दोघही तिच्या मदतीला होते.ललीत बराच वेळ पेशंटच्या नातेवाईकाबरोबर बोलत होता. आता त्या उंच माणसाबरोबर एक -दोघं होते.खानोलकर साईड रूम मधल्या कॉटवर आडवा पडला होता.ललीत काही वेळानी परत गायनॅकच्या सिनीयर ला घेऊन नातेवाईकांबरोबर बोलत होता.
“नाही.या परीस्थीतीत मी काही रिस्क घेणार नाही. सकाळी डॉक्टर तुळपुळे येतील त्यापूर्वी तुम्ही अल्ट्रा साउंड करून ठेवा.”
सगळ्या नातेवाईकांच्या चेहेर्‍यावर फारशी काळजी दिसत नव्हती.फक्त तो उंच माणूस चुळबळत होता.
“मुलगा काही झालं तरी वाचायला हवा.”
त्या उंच माणसाच्या छातीवर बोटाने ठासून एक नविन माणूस सांगत होता.
“मुलगा?”
“तुम्हाला काय माहिती मुलगा की मुलगी?”
“आम्हाला माहीती आहे.”त्या नवीन माणसानीच उत्तर दिलं.
सकाळी पावणेपाच वाजता ह्या गोंधळात कुठलाच डॉक्टर पडणार नाही. पण त्या नवीन माणसाच्या आवाजातली अरेरावी लक्षात येण्याइतकी होती.
“आपण कोण?”
“सावलीचे काका आहेत ते.” उंच माणसाला पहिल्यांदा कंठ फुटला होता.
“आणि तुम्ही?’
“मी नवरा आहे तिचा.”
फाईन. तुम्ही फक्त बोला.सिनीयरच्या आवाजतली सूचना ल़क्षात येण्यासारखी होती. नवीन माणसं दूर जाऊन उभी राहीली.
“हे बघा, सकाळी या युनीटचे सिनीअर येतील ते काय त्या सूचना देतील. तोपर्यंत थांबावंच लागेल .ब्लड वगैरेची व्यवस्था ठेवा.
हा फीमेल वॉर्ड आही आता जास्त थांबू नका.”ललीतनी सम अप करत सांगीतलं.
“मला दहा मिनीटं द्या. “
“कशासाठी . प्रार्थनेसाठी.”
“ओके.फक्त तुम्ही आत जा.”
सरीता पेशंटच्या बेड जवळ उभी होती.आता ब्रीदींग जरा नॉर्मल होतं. कानातून आलेलं रक्त साकळून काळं पडलं होतं.
सिस्…त्या उंच माणसानी हाक मारली.
“आय वाँट टु प्रे.”
त्याच्या हातात चांदीची छोटी घंटी होती.
“नो नो घंटी वगैरे वाजवू नका.”
“सिस् या घंटीचा आवाज येत नाही.”
सरीता बाजूला टेबलजवळ उभी राहिली.
हलक्या आवाजातली प्रार्थनेची गुणगुण यायला लागली. घंटीची किणकिण त्यात भर घालत होती.इतका नाजूक आवाज .कधी न ऐकल्यासारखा.
सरीताला झोप अचानक अनावर झाली. बाजूच्या चेअरवर जेमतेम बसेस्तो गाढ झोप लागली .ती जागी झाली ती पै नी चार हाका मारल्यावर.
“काय . स्टाफ काय आहे? वॉर्ड मध्ये सगळे झोपलेत. खानोलकर सर कुठे आहेत.”
“साईड रुम मध्ये.”
“आणि ललीत सर?”
“मला नाही माहिती.”
“अजीब बात है.” असं पुटपुटत त्यानी फाईलीवर नोट घ्यायला सुरुवात केली.
सरीतानी बाबाला हाक मारली .मावशांना हाक मारली.
सगळे गाढ झोपेत.
पावणे सहा वाजलेत.
माय गॉड..अजून राउंड घ्यायचा आहे.. टेंपरेचर. पल्स मॅपकरायच्या आहेत.
मावशी, रेखा मावशी..
हळूहळू पंधर मिनीटात सगळं रुटीन सुरु झालं .चहा आला.
पैचे डोळे लालभडक दिसत होते.
ओके. स्टाफ.. तो आणि खानोलकर निघाले.
साडेआठ वाजता बॉसचा राउंड आहे.
“सावलीची केस आधी घ्या.फॉर्म सगळे भरलेत.”
“गायनॅकची सिनीअर…
मॉर्नींग स्टाफ बघेल काय ते..”जा आता.
पै आवाज न करता हसला..
“स्टाफ तुला आवडत का नाही ती? मला तर ती सुंदर…”
“मास्क लावला की सुंदर दिसते ती..”.सरीताचा फणकारा उसळला..
सरीता कमाला लागली.ओव्हर देउन बाहेर पडता पडता साडेसात वाजलेच.वॉर्डच्या बाहेर तो उंच माणूस आणि दोघं नातेवाईक
कुठल्यातरी वादात गुंतले होते..
दोयुग्माचा प्रिंस . .. कालीटकेरी …असे काही न समजणारे शब्द तिच्या कानावर पडले.
———————————————————————————————
खाली उतरून स्टॉपवर आली तेव्हा एक २०१नंबर समोरून जात होती. आता आणखी विस मिनीटाचा खोळंबा असं मनात येईस्तो पाठून हाक आली .
सिस् … एस्टॅब्लीशमेंटचा खांबेटे बोलवत होता.त्याला बघून सरीता हसली.
काय हो खांबेटे?
तुमचं नाव बदलून आलंय हं.येत्या पगारापासून तुम्ही सरीता गोपाळ कुळकर्णी.
थँक्यू.
पण ते अजून आणखी एकदा बदलायला हवयं असं म्हणून खांबेटे हसत हसत गेला.बस आली.
दादांना जाउन तीन वर्षं होउन गेली.त्यांच्या आठवणीनी ती गंभीर झाली.कुठल्या जन्माच्या या गाठी सुटता सुटत नाहीत. एक वळण चुकलं तर दुसर्‍या वळणावर हजर असतात.सता म्हारीण ते सरीता आठवले एक दहा अकरा वर्षाचा प्रवास.डोळे मिटून घेतले आणि ती हळूच इंचगिरीच्या मठात पोहचली.
आई आणि बाप म्हणजे काय असतात हे कळायच्या आधीच ते गेले होते. तिला आठवत होता तो फक्त आजीचा खरखरीत हात. जुन्या लुगड्याच्या पदराचा वास आणि वैशाखातलं उन.इंचगिरीच्या मठाची आठवण उन्हं चढली की होतेच होते. निंबाळच्या जवळचं एक छोटं गाव. खूप सारी चिंचेची झाडं.जुना मठ. दिवसातून पाच वेळा आरतीचा घंटानाद. दुपारी आणि रात्रीची जेवायची सोय.अना म्हारीणीची नात एव्हढीच तिची ओळख.अना म्हारीण ही मात्र फार मोठी ओळख होती. वैशाखी पौर्णीमेला आख्खा गाव पाया पडायला धावायचा.एरवी दिवसभर मठाचं अंगण झाडणारी म्हारीण त्या दिवशीचं दैवत . फार फार वर्षापूर्वी अंबुराज महाराज कर्नाटकाच्या सिमेवरून भरकटत इंचगिरीला आले.योगाच्या कुठल्यातरी वाटेवर ओळख -खूण हरवली आणि आता जिथे मठ आहे तिथे भ्रांत विसरून बेहोश पडले.तापलेली धूळ आणि वैशाखाचं उन.म्हारीण दूरून पहात होती. महाराजांना पाहून तिला कळलं की हा ब्राह्मण आहे.शिवणार कसं.गाव चार कोसावर.बोंब उठवली तरी गाव जमा होईस्तो ब्राह्मण तडफडून मरेल.तोळामासा शरीर.म्हारीणीनी धैर्य एकवटलं. महाराजांच्या गळ्यातलं जानवं तोडून दूर फेकून दिलं .घोंगडीवर ढकलून ओढत ओढत बावडीजवळ नेलं.दगडाच्या आधारानी बसवून चार घागरी पाणी ओतलं.दोन घटकांनतर महाराज देहभानावर आले पण ओळख विसरले होते. परत शुद्ध हरपून पडले.संध्याकाळी शेरडं गोळा करून म्हारीण घरी निघाली. करावं काय. ब्राह्मण तर बेहोश.शेरडं मोकळी सोडावी तर लांडग्यांची धन.महाराजांना घोंगडीत गुंडाळून अना म्हारीण घराकडं गेली. रात्री महाराज स्वप्नात आले. म्हणाले आई पोराला रानात सोडून आलीस होय? भुकेची वेळ झाली माझी. अना शेरडाचं दूध आणि चार भाकरतुकडे घेऊन रानात धावली.बघते तो काय महाराज पद्मासन घालून ध्यानमग्न. पहाटे चंद्र मावळतीला आला तेव्हा महाराज जागे झाले म्हणाले आई, फार वाट बघायला लावलीस.म्हारणीनी आईच्या मायेनी महाराजांना दूध भाकरीचा कुस्करा भरवला.लोटीभर पाणी पिऊन महाराजांनी तृप्तीचा ढेकर दिला तेव्हा सकाळ झाली होती. लिंगायतांची चार माणसं वाटेवर बघून म्हारणीनी बोंब मारली म्हणाली सांभाळा आपल्या देवाला.
महाराज तिथेच राहीले. इंचगीरीच्या लिंगायत आणि ब्राह्मणांची भांडणं संपली ती महाराजांच्या मठात. अना म्हारीणीला पहिला गुरुपदेश दिला.

सिग्नलला बस थांबली आणि सरीता परत वर्तमानात आली.मग दादांची आठवण आली. दादा मठाचे ट्रस्टी. अना म्हारीण गेली तेव्हा सरीता तेरा वर्षाची. दादा प्रेमळ माणूस. त्यांच घराणं इंचगीरीच्या इनामदाराचं. मुंबईत ब्याडगी मिरचीचा पुरवठा करायचे.वरळीला म्युनसीपालटीच्या बराकीत एक छोटी रुम घेउन रहायचे. त्यांनी सरीताची जबाबदारी घेतली. विजापूरच्या वसतीगृहात सरीताची रवानगी झाली.घरी काकूंचं सोवळं ओवळं फार.मूलबाळ नाही. पोटात माया पण नाही.मॅट्रीक झाल्यावर पंचाईत. वसतीगृह सोडावं लागलं. सरीता परत मठात. चार पाच महिन्यानी ट्रस्टींनी दादांना तार केली.म्हारणीच्या पोरीची व्यवस्था करा. गावातून विरोध होतो आहे.आश्रमाच्या भक्तात दुफळी माजली.दादा घरी पण ठेवू शकत नव्हते. मग डॉ़क्टर बागलवाडींनी चिठ्ठी दिली. केईएमच्या शिकाऊ नर्समध्ये भरती झाली. दादा थकले .त्यातच काकू पण गेल्या. शेवटची सहा वर्षं दादांची सांभाळण्यात गेली.पुतणे गावाहून आले. त्यांच्या डोक्यात भिती.म्हारणीची पोर दादांच्या हिश्यावर हक्क मागते का काय.? दादांनी हिस्सा सोडला. जाण्यापूर्वी तीन वर्ष सरीताला दत्तक घेतलं.म्युनीसीपालटीची जागा नावावर केली. सता म्हारणीची सरीता गोपाळ कुळकर्णी झाली.
पोद्दार.. पोद्दार.. कंडक्टरचा आवाज आला. सरीता उतरली.
नाईटची झोप आणि पोटात भुकेचं थैमान.कधी घरी पोहचते असं झालं होतं. सिग्नलला रस्ता पार करताना बाजूच्या माणसाकडे लक्ष गेलं. रात्री ऍडमीट झालेल्या पेशंटचा आगाऊ बोलणारा नातेवाईक तिच्या बरोबरीनी चालत होता.

पेशंटच्या नातेवाईकानी पाठलाग करणे हे सार्वजनीक हॉस्पीटलच्या नर्सला काही वेगळा अनुभव नसतो. त्याचा इलाज पण रामबाण असतो. मावशीबाईला सांगीतलं की दुसर्‍या दिवशी पॉट देऊन ती नाहीशीच होते. पेशंट रडकुंडीस आला की पाठलागी नातेवाईकाला सगळं निस्तरायला लागतं. पाठलाग संपतो.
पण हा काहीतरी वेगळाच अनुभव होता. त्यानी ओळख पण दाखवली नाही. रस्ता पार करून निळ्कंठेश्वराच्या समोर जेव्हा ती आली तेव्हा मागून हाक आली.
सिस्टर.. एक मिनीटं..
हवेत वेताची छडी फिरवल्यावर जसा आवाज येतो तसा आवाज , नव्हे आज्ञाच.
ती पाठी वळली. नजरेला नजर देऊन पाहीली.शक्यच झालं नाही. दोन धगधगणारी बुबुळं.
वेंकटेश काय बोलला तुमच्याशी?
तिला काहीएक कळलं नाही. नजरबंद शिकार. दंश करायला फणा सज्ज.
दोयुग्मा बद्दल काय सांगीतलं?
उत्तर दे लवकर्..प्रश्न कानात येउन निष्फळ होतं होते.
मला काही नाही कळत … परत एकदा प्रश्नांची फैर .आता थोडी घाई .शिकार्‍याचं लक्ष विचलीत पण शिकारीचं पाउल मंत्रमुग्ध जागीच स्थिर.
थांब एक मिनीट.अंगावरून गरम हवेचा झोत गेल्यासारखं वाटलं.
प्रश्न आदळून विरत होते. काचेच्या कंच्यावर कंचा आपटून जसा टिचल्याचा आवाज येतो हुबेहुब तसंच
टच् टच्च. आता आणखी एकदा आघात झाल तर ठिकर्‍या ठिकर्‍या उडणार.
निळकंठेश्वराच्या देवळात घण्ण घंटा वाजली.एक हाक आली सरीता… सरुताई…
सरीता भानावर आली. समोर भावेकाकू उभ्या होत्या.
अगं काय खुळ्यासारखी बघतेयस..
बाई ..बाई.. चल घरी .तब्येत ठिक नाही का तुझी.
तो माणूस दिसेनासा झाला होता.
सारखं मागे वळून बघावसं वाटत होतं पण धीर होत नव्हता.
घरी पोहचल्यावर महाराजांच्या फोटो समोर उभं राह्यलावर बरं वाटलं.
तुमचा मी भार वाहीन नव्हे हे अन्यथा वचन माझे
पुन्हा एकदा आठवून पाहीलं.तिनं काहीच उत्तर दिलं नव्हतं.
मनावरचे आक्रमण थोपवून ती यशस्वी झाली होती.
सुधीर मन.देवा आभारी आहे मी तुझी
दुपारी शांत झोप लागली.
———————————————————————————————
श्रीकांत सोमण. वझलवार कॉलेजचे भाषा विषयाचे प्रमुख.भाषा विषय विज्ञानासारखा तर्कनिष्ठेने शिकवणारे शिक्षक. नावालाच वझलवारचे शिक्षक .देशभर दौरे.आजचे लेक्चर वर्षभरात होणार्‍या दोन पैकी एक .तीन तासाच्या लेक्चरनंतर तीन तास शंकासमाधान.
मराठीतील गूढ कविता …सकाळी साडेनउपासून आज सुरुवात झाली आहे…
” मुका चाफा कसा फुलून येतो. देहासक्ती संपलेला संन्यासी आहे का चाफा?
पानन् पान गळून गेल्यावर चाफा कसा फुलतो. चाफाच का?
हे फुलणं फक्त कावळ्यालाच का दिसावं?”
लेखण्या भरभर चालत होत्या . सौंदर्याशास्त्राच्या अंगानी कवितेचे रसग्रहण . वर्षातले एकुलते एक लेक्चर असते.
हिरवी पानं पोक्त पिवळी होतात तेव्हा त्यांना कळत असतं का की जीवन क्रमाचा हा शेवटचा टप्पा आहे?
त्यांच्या मागे नवीन कोंब उभा आहे. नाटकाच्या स्टेजवरच्या विंगेत नट वाट बघत असावा तसा?
नाही. हे वाक्य गाळा .आपण आता सौंदर्यतर्क करतो आहे. हे स्वातंत्र्य तर्कसंगतीत आपल्या आहे पण कवीच्या नाही.सरसर वर्ग पुढे जातो आहे.
****
चला सतारीचे बोल पहा.
… सतारीचे बोल… दिडदा ..दिडदा…का दिडदा दिडदा
कारण ही कविता तराणा आहे .
तराणा कसा?
चला परत एकदा भावनांची पेशकारी बघा शास्त्रीय संगीताच्या अंगाने.
आधी नोमथोम.गायक आपली ओळख साधर्म्याच्या अंगाने पटवतो आहे.
मग आलापी ..ओळखीचा पहिला टप्पा..
मूड बनला? चला ताबा घ्या मनाचा…
अंतरा ..खात्री पटली
आता दृत..रागीणीच्या बरोबरीनी ताना… पट्टे.
आता तराणा
शब्दांची गरज संपली आहे
सायुज्यता .साधर्म्य सगळं मागे पडलं आहे,फक्त सरूपता..
क्रेसेंडो..
जर सतारीचे बोल सजायचे असतील तर कविता संगीताच्या अंगाने वाचा.
ही छुपी कळ कविजवळच असते.
प्राचीन आणि अर्वाचीन असा फरक नाही
बघा समर्थांची आरती
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी
संख्या चंद्रकळा गुणे..
काय अर्थ लागतोय का?
सोळाव्या वर्षी विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले..
विद्यार्थी मोहीनी मुग्ध..
*****
स ..सर..
दारात शिपाई उभा आहे..
तुमचे पाहुणे आलेत.
सोमण एकदा डोळे पुसतो..उत्कटतेने बोलताना हा एक मोठा अडथळा.
पंधरा मिनीटानी भेटू या.
मनमोहन अग्रवाल उभे होते. सोमणांना पाहून ते पुढे आले.
नमस्कार. माझं काम झालंच असेल.
सोमण काही जास्त न बोलता एक बॉक्स पुढे करतो. ह्यात सोळा सीडीज आहेत.चार कोरकूंच्या .
मला एक उलगडा कराल का?
अग्रवाल काही न बोलता खिशातून एक बंद पाकीट काढून सोमणच्या हातात देतात.
एक लाख पंचेचाळीस हजार.आतापर्यंत कापलेल्या कराचं प्रमाणपत्र सोबत आहेच.
या संस्थेचा कायम स्वरूपी पत्ता नाहीये का?
माफ करा सर पण त्यांना आताच सगळी माहिती देण्यात रस नाही.
त्यातून तुमच्या कामाची थोरवी ऐकून ते आलेत म्हणजे…काही कमी वाटल्यास तुम्ही मला सांगण्यात संकोच करू नका.
नाही पैशाचा काहीच प्रश्न नाही..मला एक उत्सुकता होती की…
वाक्य संपायची वाट न बघता वकील साहेब चालायला लागले होते.
सोमणचा मूड खराब झाला होता.
जवळजवळ चौतीस आदिवासी भाषांचा तौलनीक अभ्यास ..
किंमत रुपये सव्वा तीन लाख.
काल बायको म्हणाली ते खरेच.
कुणी दिले असते असे पैसे.
****
सोमण वर्गावर परत आला विषय पुढे सुरु झाला……
शब्द म्हणजे मनावर एक आघात. या आघाताचे उठलेले तरंग म्हणजे विचार .एका नविन शब्द समूहात.
शब्दात बांधलेली भाषा त्याच रुपात परत उत्तर देते.ही भाषेची मर्यादा .
म्हणूनच नवी भाषा शिकणे लहानपणी जेव्हढे सोपे तेव्हढे मोठेपणी कठीण.
असेही काही मानव असतील ज्यांना भाषेशिवाय विचार करता येत असतील?एक स्मार्ट प्रश्न .
होय. पण त्याची ग्वाही देणं माझ्यासारखे भाषाशास्त्री देउ शकणार नाहीत. तो विज्ञानाचा विषय आहे
पण सर ज्या मानसीक स्तराची आपण चर्चा करतो आहे त्या स्तरावर भाषा विज्ञानच नाही का?
येस. खरं आहे पण एंडोर्समेंट कुठल्यातरी बोली भाषेतच मिळणार ना मग ….
वर्गात शांतता.
असो ..आज थांबू या इथे.
भाषाशास्त्राचा अभ्यास करताना तर्काचे बोट धरूनच फिरावे लागेल .आतापर्यंत चर्चेत आलेल्या कविता मायाबाजारासारख्या आहेत. तर्काबाहेरचा एक विचार मनाचा पट सहज उधळून टाकेल.
आता सोमणांना थांबावेसे वाटत होते. सोळा सीडीज मधले भाषाविज्ञान त्या अज्ञात राजकुमाराला भाषेशिवाय विचार करायला शिकवणार होते.या मुलांना ते शिकवणं शक्य नव्हतं .करारातला अविभाज्य भाग हेच सांगत होता की सव्वातीन लाखात त्यांनी ..
इतिहास काळात पैशाची नड असलेला गायक एखादा राग गहाण ठेवयचा तसंच.
(आणि म्हणूनच ज्या मुलाच्या जन्माची तयारी अग्रवाल वकीलाचे अशिल करत आहेत ते मूल बोलायला लागल्यावर भाषा हे बंधन नसेल.या मुलाचे मन एकाच वेळी अनेक विचार भाषेशिवाय करेल.)
—————————————————————————————————
नाईटला जायचं आहे या विचारानी सरीताच्या मनात परत एकदा खळबळ माजली. तो असेल का बाहेर उभा. एक सोपासा विचार केला.पै ला फोन केला. पै मेस मध्ये जेवत होता.
रात्री सगेवाल्यांचे पास चेक करू या. पास नसतील त्यांना बाहेर हाकलू या.पैनी सांगीतल्यावर ती रिलॅक्स झाली.केईएम च्या दहा नंबरला एक जिना डिन च्या ऑफीससमोरून जातो.या जिन्याचं एक रेप्युटेशन आहे. निर्ढावलेले वॉर्ड बॉईज सुद्धा रात्री हा जिना
टाळतात.सरीताला या भितीची भिती कधीच नव्हती. गेटवर आल्यावर तिनी सिक्युरीतीला सोबत घेतलं.वॉर्डच्या बाहेर रेंगाळणार्‍या सगळ्या सगेवाल्यांचे पास तपासले.दोघा-चौघांना हाकलून दिले.तो मात्र कुठचं दिसत नव्हता.तो उंच माणूस कोपर्‍यातल्या पीसीओवर बोलत होता. सरीताला पाह्यल्यावर तो पुढे आलाच.
तुमचा सासरा कुठे आहे?
ते येणार नाहीत.
बरं आहे . नाहीतर आज आम्ही फटकवणारच होतो त्यांना. स्टाफच्या मागे मागे…सिक्युरीटीचा चौगुले म्हणाला.
मला कल्पना आहे.ते इथं पाऊल पण टाकणार नाहीत.मी माफी मागतो.
प्रकरण बंद झालं.
एक गोष्ट सरीताच्या लक्षात आली की हा माणूस फार प्लेन बोलतो आहे.दोन वेगळे किंवा छुपा अर्थ असलं असं काहीच त्याच्या बोलण्यात नाही.
चौगुलेची पाठ वळल्यावर पुन्हा त्याला बोलावलं.
तुमची बायको फार सिरीयस आहे. हे लक्षात घेउन मी तक्रार करत नाही आहे …पण
आणि हो आज मी तुम्हाला प्रार्थना करायला …वाक्य अपूर्णच राहीलं. खानोलकर, पारेख, पै ,नाईक सगळी न्युरो मंडळी वॉर्डात घाईघाईत आली.सावलीच्या बेड जवळ कोंडाळं करून चर्चा सुरु झाली.
आश्चर्य म्हणजे मेडीसीनचा सिनीयर , रेडीओलॉजीचा सिनीयर पण त्यांना जॉईन झाले होते.
खानोलकरनी सुरुवात केली. अर्धवट कान देत सरीता पण ऐकायला लागली.सावलीचा नवरा कोंडाळ्याच्या मागे शांतपणे उभा राहीला होता.संध्याकाळी सगळे रिपोर्ट आले होते.
पै सकाळी बॉस काय म्हणाले?
एलेक्ट्रोलाईट इस्पेशली मॅग्नेशिअम , झिंक देखो. मॉनीटर करो.
व्हाय?
पै नी या प्रश्नाची तयारी केली होती.
कारण Magngesium acts as a catalyst conductor in the synapses of the brain’s memory centers.
फाईन.स्कॅन दाखव. ..
ट्युबलाईटच्या प्रकाशात प्लेट धरून खानोलकरनी दाखवलं.लूक ..इथं दिसतय पहा convex, lens-shaped याला म्हणायचं extracerebral hemorrhage
Epidural hematoma (EDH) पै नाईक जीवाचे कान करून ऐकत होते .दुसर्‍या युनीटचे सिनीअर लक्ष देऊन बघत होते
आता सूलीनी प्लेट हातात घेतली..येस. यु आर राईट.
स्टाफ वॉमीटींग किती आहे?
मी आल्यापासून नाही. ओव्हर देताना स्टाफनी पण काही नोट केलं नाहीये. सरीतानी सांगीतलं
Epidural hematoma कवटीच्या आत प्रेशर तयार करतं.म्हणजे एडीमा ?
वेल , सो फार ,कमी आहे.
ब्लीडींग बंद आहे. गूड.
कमॉन बॉईज फास्ट रिव्हिजन करू या
नो leaking cerebrospinal fluid ..
नो बेसीलर फ्रॅक्चर सगळे जण एका सुरात म्हणाले..
नो संकन आईज ऑर नोज्
non-indicative maxillar fracture ..
मेंदूवर सूज नाही ,रक्त थांबलं आहे. पाणी वाहत नाही और..ऑल व्हायटल ..ओके.
decompressive craniectomy प्रश्नच येत नाही
पै आता रंगात आला होता
पण मग आपण काय करायचं काय . ही आपोआप बरी होणार आणि घरी जाणार..
खानोलकरनी एक दयार्द्र नजर टाकली.
गायनॅकच्या सिनीअरकडे टक लावून बघतोस त्यापेक्षा अल्ट्रा साउंड बघा..
सरीताच्या हातून इंजेक्शन बल्ब पडला..खळ् कन फुटला..
सगळे टारगटासारखे हसले.
सूलीनी अल्ट्रा साउंडचे रीपोर्ट दाखवले. प्लेसेंटा जागेवर आहे. बेबी हेल्दी आहे.
आय डोंट सजेस्ट…
मेडीसीनचा सिनीअर पुढे झाला.
(खानोलकरची टीम लीडर म्हणून कामगीरी कौतुक करण्यासारखी होती.
एका वेळेस तीन टीमच्या सिनीअरना हाताशी धरून ठेवणं कठीण असतं.)
पेशंट सरफेसवर आला की मेमरी लॉस शक्य आहे..
मला वाटतं pemoline मॅग्नेशियम रायलट्युब मधून देऊ या का?
उद्या नागपाल सर आले की तुला कॉल देतो..
या ड्रगचे इंडीकेशन काय आहेत?
यार बच्चू है पेटमें पारेखचा सूर काळजीचा होता.
हम्म .. खरं आहे.. सिस् pemoline असेल का?
फार्मा ला विचारते सकाळी.. सरीता म्हणाली.
पण द्यायचं का?
सगेवाल्याची परवानगी घ्या.
तो उंच माणूस पुढे आला . सर…as late as Sep 2004 the US army still admits to dispensing pemoline for ADD and “narcolepsy” and when they say narcolepsy, they mean pep pills. Basically, soldiers are expected to perform at abnormal rates for abnormal periods.
सगळी टीम एक क्षण गप्प झाली ..
आपण कोण?
मी व्यंकटेश प्रसाद.एक पातळ बिझिनेस कार्ड त्यानी खानोलकरच्या हातात दिलं .
सायनो लॅब्ज .न्यु मेक्सीको.
आय डोंट बिलीव्ह धिस…
मेडीसीनचा सिनीअर म्हणाला गेल्या महीन्यात पुण्याला आगाखान मध्ये तुमचं सेमीनार होतं .
मिस्टर आय ऍम सॉरी डॉक्टर प्रसाद काल पासून तुम्ही इथे आहात पण ..
इट्स ओके. लाईन ऑफ ट्रीटमेंट जशी असायला हवी तशी होती ..वेल आय हॅड सम पर्सनल प्रॉब्लेम टू डील..
प्रसादनी हलकेच हाक मारली
सिस् माय अपोलॉजीज.
सरीताला काय बोलावं ते कळेना.
सर कॅन वी हॅव प्रीविलेज ऑफ डिनर टूगेदर…
सम अदर डे.अ डे बीफोर डिसचार्ज परहॅप्स..
सगळे आनंदात आपापल्या होस्टेलच्या दिशेनी गेले.
सावलीचे पल्स चेक करण्याच्या निमीत्तानं सरीता पुढे झाली .
सर आय ऍम सॉरी..
सिस् नेवर माईंड त्रिभुवन मूर्ख आहे.
सरीताकडे बघून प्रसाद हसले.
नो हार्ड फीलींग्ज
नजरेला नजर देणं कठीण झालं सरीताला.ती त्यांच्या कडे बघून हसली. आता जराजरा नीट निरखून पाह्यल्यावर तिला कळलं की प्रसाद एक देखणा ..
सिस् टाईम टू प्रे.
काल रात्रीची तिला आठवण झाली.
सर ती घंटी वाजवू नका.प्लीज सर .. त्या आवाजानी झोप येते.
काल मी मनाई केली होती ती घंटी वाजवायला.
त्याचा चेहेरा पडला .
मॅडम या घंटीचा आवाज येणं शक्य नाही. खिशातून घंटी बाहेर काढून त्यानी दाखवली.त्या घंटीला टोला नव्हता.
मग रात्री मला किणकिण ऐकू येत होती ती कशी?
कसं शक्य आहे.?
या घंटीचा आवाज फक्त…माय गॉड.. आता आवाजात आश्चर्य आलं.
आता बघा
त्यानी घंटी हातात दिली.
ओके हलवून बघा..
आला आवाज ?नाही ना?
मॅडम आवाज फक्त दोयुग्मांना ऐकू येतो.
आता बघा , त्यानी हातातली घंटी एका वेगळ्याच प्रकारे फिरवली.
किण्..किण ..
आला आवाज .होय येतोय आता आवाज.
मॅडम हे शक्य नाही. परत ऐका.
येतोय आवाज
होय येतोय. त्याचे डोळे विस्फारले.
याचा अर्थ तुम्ही पण..दोयुग्मा..
सरीताला खुळचटपणाचा राग आला .
मॅडम इकडे लक्ष द्या…आवाज वेगळा आला.
जर तुम्ही म्हणता ते खरं असेल तर ..यु आर द ब्लेस्ड वन
आता पुढे येउन त्यानी रस्ता अडवला.डोळे चेहेर्‍याकडे रोखून तो स्तब्ध झाला.
नाव बी सिरीयस. काल जर आवाज ऐकू आला असेल तर त्यामुळेच तुम्ही आज त्रिभुवनच्या हल्ल्यात वाचलात .
कोण त्रिभुवन ? कसला हल्ला?
त्रिभुवन ? माझे सासरे.
निळेडोळे आणखीनच गडद झाले.
तुम्हाला रस्त्यात ज्यानी गाठलं तो त्रिभुवन. तो हल्ला मानसिक पातळीवर होता.
तुमची स्मरण शक्ती ताब्यात घेउन त्यानी काही शोधायचा प्रयत्न केला. असफल झाला.
काल रात्री ह्या किणकिणाटाने एक फायरवॉल बनवली आहे तुमच्या मनात.त्रिभुवनचे सगळे प्रयत्न बाउंन्स झाले ते या फायर वॉलमुळे.
सी धिस सरफेस .
त्यानी हातातली घंटी दाखवली. याच्या सरफेस वर चांदीचे नॅनो पार्टीकल आहेत.
ही अशी फिरवली तर वेव्हज येतात पण त्या फक्त ट्रेंड ब्रेनलाच.
अदरवाइज नॅचरल दोयुग्मांना.
सिस् आय ऍम सो हॅपी . यु आर वन ऑफ अस.
प्रसादच्या निळ्या डोळ्यांच्या मोहेनीतून बाहेर यायला सरीताला बराच वेळ लागला.
अजून नाईटचे सात दिवस बाकी आहेत आनि आजच्या रात्रीचे सात तास.
प्रसाद , मला आज झोपायचं नाही आहे.
अपरीचीत माणसाशी का एव्हढी सलगी? तिच्या मनानी दटावलं. पण मन ऐकेनाच.
बाहेरच्या कॉरीडार मधून कुणितरी ट्रांझीस्टर घेउन जात होतं.
तिचं आवडतं गाणं.
नैनमे सखी शाम समाए.
———————————————————————

सप्टेंबर 2, 2008

मानवाचा वानरापासून नरापर्यंतचा प्रवास उत्क्रांतीवादाच्या आधारानी जवळजवळ आता सर्वमान्य झाला आहे. पण काही जण एका वेगळ्या मतप्रवाहाचे पुरस्कर्ते आहेत.त्यांच्या मते माणसाचं बिज परग्रहावरून आलेलं आहे.काहीजण असंही म्हणतात की माणूस ही सरमिसळ जमात आहे. पृथ्वीवरची मानव जमात आणि परग्रहावरची मानव जमात शरीरानी एकसारखी असल्यामुळे हा प्रवाह एकत्र कधी झाला हे कळायला वैज्ञानीक सिद्धांत अपूरे आहेत.पण परग्रहावरची ती मानव जमात आपल्यापेक्षा ऊच्चतम होती. आजही शुद्ध वाण कुठंतरी आहे.ते आपल्यापेक्षा श्रेष्ठआहेत.त्यांना ते कळलं नसावं अजूनही.वेगळेपणा कळेल तेव्हा काय होईल. ते आपले असतील का?आपली आई इथली की …
युरी गेलरचं चरीत्र वाचल्यावर मलाही असंच वाटलं.अशी माणसं येतात तरी कुठल्या वाणातून? जर त्यांनी उद्या वेगळं व्हायचं ठरवलं तर?
कथा काल्पनीक आहे.कुणिही वैज्ञानीक कस लावू नये इतकी काल्पनीक ठेवली आहे.पण वेगळेपणाची जाण आली तर ?कथा किती मोठी आहे याचा अंदाज मलाही आज नाही. क्रमानी लिहिणं भाग आहे.

————————————————————————————————————————————————-
वॉर्ड नंबर दहा:
सरीतानी एकदा परत अंदाज घेतला.आजची इमरजंसी फार हेवी नसेल बहुधा.साडेअकरा वाजता दोन ऍडमिशन .किरकोळ हेड इंज्युरी.सकाळी बॉसची फेरी झाल्यावर डिसचार्ज.
दहीहंडी होऊन गेली होती.रविवार म्हणजे कार ऍक्सीडेंट कमीच. आली केस तर पहाटेचं .नाईट सुपरचा राउंड दिड वाजता.सरीतानी बाबाला हाक मारली. आल्यापासून बाबा दिसलीच नव्हती.मरीयमला बघितल्यावर जरा बरं वाटलं.फारच शिकाउ पाठवली नव्हती.तसं पाहिलं तर न्युरोच्या वॉर्डला जरा बर्‍या मुली येतात. जनरल मेडीसीनची इमरजंसी असली तर दोन बाबा तरी लागतातच. न्युरोला एक जरी असली तरी पुरते.ट्रान्सफर सकाळी येतात.
बाबा ,ट्रे लेके आ.चार नंबर का बीपी अवरली है. दस का टेंपरेचर अवरली है.
सेरी.. मै देखता है.
बाबा गेल्यावर एक राऊंड घेतला. दोन नंबरची राईल ट्यूब जागेवर चिकटवली. तिची सगेवाली गाढ झोपली होती. तिला एक धक्क्का देत उठवून ती सोळा कडे गेली .
गुरुवारी तिला शंट टाकला होता. आता हळूहळू हुंकार देत रडत होती.
ताप आहे का?
आई असावी , तिनी मानेनीच नाही सांगीतलं.
टेबलजवळ आल्यावर आठवलं
आयाबाई कौन है रे?
ममता है स्टाफ.
ममता…तेरी जोडीवाली कौन हय आज?
रेखा है स्टाफ..रेखा पूरवा
सरीता आणखी रीलॅक्स झाली.दोन आयाबाई आहेत.
साईड रूम मध्ये पेशंट नव्हता.आय.सी.यू. दोन आठवड्यासाठी बंद होती.
इंजेक्शनचा स्टॉक बघितला. आय.व्ही. सेट ब्लडसेट पुरेशे आहेत की नाही परत अंदाज
घेतला. शरद पंड्या , नागपाल ,कारापूरकर सर तीन बॉस .फार काळजी घ्यावी लागते.ललीत पारीख रजीस्ट्रार. पै-रायतूरकर आणि नाईक हाउसमन. नो टेंशन .
काल लाँग ऑफ होता.आज झोप येण्याची शक्यता नव्हती.
साडे बाराला बाबा हळूच कानाशी लागली.सरीता हसली. नर्सच्या बॉयफ्रेंडला फार जागरणं करावी लागतात.बाबा बाहेर पीसीओ वर चिकटली.अर्धा तास असाच शांततेत गेला.थोड्या वेळानी बाहेर मोठमोठ्यानी बोलण्याचे आवाज आले.बाबा आत आली कामाला लागली.आवाजावरून सरीतानी ओळखलं होतं ललीतपारीख आलाय. रजीस्ट्रार आलाय म्हणजे ऍडमिशन असणारच.सोबत त्याचा रीडर बघून तिला जास्तच आश्चर्य वाटलं.व्हीआयपी ऍडमिशन असावी बहुतेक.
क्या स्टाफ आराम है ना आज.?
तुम्ही आलाय म्हणजे आराम संपला आमचा.
आज हाऊसमन कुठेय तुमचा?
स्टाफी मला एक सांगत्या पैची तू वाट का बघतेस?
सरीतानी दुर्लक्ष करून रीडरला विचारलं सर व्हीआयपी एडमिशन आहे का?
तो केस पेपर वाचता वाचता म्हणाला मलाही तोच प्रश्न पडतोय .
काय?
तू पै रायतूरकरची वाटका बघत्येयस?
सर काहीतरी काय?
त्याच्या राउंडची वेळ झाली म्हणून..
म्हणजे हा रोज राउंड पण घेतो?
खानोलकर आणि ललीत खदखदा हसायला लागले.
बाहेर किटलीचा आवाज आला.दिड वाजले .पँट्रीचा चहा आला होता.
चला चहा घे पटापट.ऍडमिशन ऑन द वे आहे.
सरीताचा प्रश्नार्थक चेहेरा पाहून खानोलकर म्हणाला.मेजर आहे हेड इंज्युरी.ब्लीडींग. ते नाही थांबलं तर शॉक. एक्सप्रेस हायवे .
ब्लड?
येउ दे तुझा हाउसमन. लिहील मेमो.
बाय द वे. आयाबाईला गायनॅकचा कॉल घेऊन पाठव .
आता हे काय?
सात महिन्याची प्रेग्नंसी आहे..
बरं झालं सर तुम्ही आलात
मी आलो कसला? या पोरांना रूम वर शिकवत होतो ..
आता आहे म्हणून आहे.
थांबू नारे ? हा प्रश्न ललीत साठी होता.
मालीक ही इमर्जंन्सी मी त्या हांगपळ्याला घेऊन पार नाही करणार .थांबा ना बॉस.
खानोलकर थांबणार हे सगळ्यांना माहिती होतं.
एव्हढं बोलता बोलता ओटीची ट्रॉली हळूच पाठीमगे येऊन उभी राहिली होती.
आवाज न करणारीट्रॉली फक्त ओटीची असते बाकी सगळ्या धडलधूक आवाज करत येतात.
पेशंट चाळीशीची बाई होती. बँडेज गुंडाळलं होतं. नाकात रायल ट्युब.आयव्ही.कॅथेटर.युरीन बॅग .एका हाताला आणखी एक कॅनुला लावूनच ठेवला होता.बाबा पुढे झाली .तिनी ओटीच्या नर्सकडून बूक घेऊन स्टाफ कडे दिलं.दोन्ही आयाबाई आल्या. ट्रॉली बेडजवळ घेऊन पेशंटला अलगद उतरवलं.ओटीचा आयव्ही सेट, चादर,मॅकींटॉश परत दिला.पेशंटचा सगेवाला पुढेपाठी घुटमळत होता.
आतापर्यंत कुणाचंच लक्ष त्याच्याकडे नव्हतं.
आयाबाईनी स्क्रीन लावला तेव्हा बिचारा मुकाट दूर उभा राहीला.
बाबानी एक स्पंजटॉवेल आणून चेहेर खसखसून पुसला. बाई जागृतीच्या सिमारेषेवर आली.
नरेश.. दोयग्मा ..दोयग्मा.आवाज खोलातून येत होता.
सगेवाल्यानी डोळे पुसून बाहेरूनच आवाज दिला .
सावली ,नरेश आयेगा.
खानोलकरनी खूण करून त्याला बोलावलं तेव्हा सरीतानी त्याचा चेहेरा पाहिला. माय गॉड ..काय निळे डोळे आहेत या माणसाचे..
त्याचे कपडे मळले होते , खोचलेला शर्टा अर्धवट बाहेर आला होता.कफची बटनं तुटली होती. पण चेहेर्‍यावर एक विलक्षण तेज होतं.
ओळख नसूनही ओळखीचा चेहेरा वाटतं होता.
आता परत मोठ्यानी हसण्याचा आवाज आला.
घ्या हाउसमन आला तुमचा. खानोलकर म्हणाला.
ललीत पेपर पाहण्यात मग्न होता.
पोलीस रिपोर्ट कुठे आहे?
आणलाय मी . पै म्हणाला.साले हवालदार सगेवाल्याला पाठवा म्हणतात.
ओ, सगेवाले इकडे या बाहेर हवालदार उभा आहे त्याला भेटा.
तो उंच माणूस बाहेर गेला.
ते आलेत हं.सरीताला नाटकी आवाजात पै म्हणाला.
डॉ.पै ,आपले रीडर इथे आहेत. ..सरीतानी नाटकी आवाजात उत्तर दिलं.
आयाबाईंच काम संपलं होतं.
खानोलकरनी आवाज दिला. सिस, ये इंजेक्शन स्टॅट.
चलो बॉईज काम पे आ जाव.तिघंही पेशंटच्या बेड जवळ उभं राहून हलक्या आवाजात बोलायला लागले.रात्रीचे अडीच वाजले होते.
वॉर्ड मध्ये शांतता आणि टेंशन जाणवायला लागलं.दूर कुठेतरी रडण्याचा आवाज आला.चार पाच बायकांचा बोलण्याचा आवाज आला…आणि बंद झाला.
फॅनचा आवाज अचानक वाढला.
नाईट सुपर हातात टॉर्च घेऊन वॉर्ड मध्ये आली.
कशी हाय हेवी का लाईट?
सरीतानी तिघांकडे बोटदाखवलं?
तिला बघून खानोलकर हसला.परत चर्चेत मग्न झाला.
बाहेर हिचा सगेवाला आहे का?
हो असेल . हवालदार सांगत होता.
काय?
काही नाही ..सांगते नंतर..
पेशंट कडे लक्ष दे .उद्या सांगते बाकी..
ललीतनी आवाज दिला
स्टाफ गायनॅकला कॉल पाठवला का?
होय सर.
…आणि त्या रीलेटीव्हला बोलाव , ब्लड आणि सर्जरी फॉर्म वर सही घे.
आत्ता?
हां आत्ता
सेक्शन घ्यायला लागेल बहुतेक.
लगबग सुरु झाली .
चारचे ठोके वाजले.
——————————————————————————–

 

अथ काकापुराण.

सप्टेंबर 1, 2008

लग्न झालं आणि मी राव झालो.बायकोच्या धाकट्या बहिणीचं लग्न झालं आणि मी पंत झालो. काही वर्षापूर्वी काका पण झालो.नैसर्गीक क्रमानी माझी उत्क्रांती होतेआहे असं म्हणता म्हणता काकापण अचानक खुपायला लागलं.पन्नासाव्वा वाढदिवस झाला त्या दिवशी माझा पुतण्या आला होता. माझ्या हातात एक गुळगुळीत कागदात गुंडाळलेलं पुस्तक देत म्हणाला काका, आता रिटायरमेंट प्लॅनींग कर. ह्या पुस्तकात बघ सगळी माहिती दिलीय. माझी बायको नाक फेंदारत म्हणाली
“हे आणि रीटायर?”
“करेला और निमचढा. ” “बाई बाई आताच घरी असतात तेव्हा हा धुडगुस घालतात .”
बोलता बोलता जीभ चावली खरी ….
पण पुतण्या टिर्‍या बडवत तासभर हसत होता.
पण आता काकापण जास्तच हुळहुळायला लागलं.
तसा आजकल भास होत होताच.कॉलनीतली पोरंटोरं त्याच्या समोरून गेलं की गप्प व्हायला लागली होती.आजकाल संडे क्रिकेटला पण बोलवेनाशी झाली होती. मी काका झाल्याची जाणिव दिवसेंदिवस अस्वस्थ करायला लागली होती. मुद्दाम पोराटोरात मिसळलो तर पाठ वळता वळता म्हातारा हिरवट आहे असंही ऐकू यायला लागलं.
काका होणं तसं फारसं वाईट नाही पण कधीकधी फिरकीतला मांजा संपल्यावर फिरकी हलकी लागायला लागते तसं फीलींग यायला लागलं होतं.
काका म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर ….
मऊ पडलेला पापड येतो.
साय धरलेला थंड चहाचा कप येतो.
सार्दळलेले वेफर येतात.
बँकेच्या बाहेर एक तारखेला हातात कापडी पिशवी आणि पासबुक घेऊन उभे राहीलेले पेन्शनर.
फॅक्टरीच्या स्टोअर्स मधला सरप्लस ऍण्ड नॉन मुव्हेबल आयटम आठवतो.
————————————————————————————————
काका होणं हा काही साधा प्रकार नाही. काका दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे काका-रेग्युलर बॅच आणि दुसरा काका- अकाली.
काका अकालीचे परत दोन प्रकार एक सु-काका आनि दुसरा होम्ममा काका.
आधी काका रेग्युलर बॅच पाहू या. हे काका इमानेतबारे नोकरी करून निवृत्त झालेले असतात. आपल्या नैसर्गीक कुवतीनुसार त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी अशी अपत्ये असतात.मुलांसाठी आधीच जागा घेउन ठेवलेली असते . सर्वसाधारण पणे धाकट्या मुलाकडे हे राहत असतात.अधून मधून मोठ्या मुलाकडे पण जातात पण ते म्हणजे कायमचं स्थलांतरण नव्हे.काही घरात काका-काकू फिरत्या ढालीसारखे असतात.
फणसासारखे किंवा अननसासारखे हळूहळू पिकत जातात.
काकूंची फाईल आधीच डिस्पॅच झाली तर मात्र काका डहाणू-विरार शटल सर्विस सारखे दोन स्टेशनांमध्ये फिरत राहतात. कुठल्यातरी एका ठिकाणी एक दिवस बाथरूममध्ये पाय घसरून पडतात.
ज्याच्या घरी पडतात तो मुलगा कपाळाला हात लावून ज्योतीषाकडे पळतो. कमरेचा सांधा मोडला तर तीन ते चार महिने हंतरूणात काढतात.
मुलगी अधून मधून बाबांसाठी प्रेमाचे दोन खणी डबे घेउन येते.बाबांसाठी आज रजा घेतली हे येणा-जाणार्‍याला सांगत राहते.
संध्याकाळी आज आई असती तर ……..हा प्रवेश वाचते आणि घरी जाते.
एके दिवशी पहाटे काका एकटेच उठायचा प्रयत्न करतात .असफल होतात. परत पडतात.
इनींग्ज डीक्लेर होतात.
दिवसवार संपतात. भावंड तेराव्याला एकदा गहिवरून रडतात.आपापल्या आयुष्यक्रमाला लागतात. एकत्र बांधून ठेवणारा शेवटचा धागाही तुटलेला असतो.
————————————————————————————————
आता काका अकाली पाहू या.: पहीला प्रकार सु-काका.
सु-काका हे अत्यंत सुस्थितीतले काका असतात.गोल्डन हँडशेक किंवा व्हिआरएस मध्ये घसघशीत रक्कम मिळालेली असते. घरचे मुळातच तसे बरे असतात. गावाकडलंही थोडसं उत्पन्न असतं.
काकू म्युनीसीपालीटी किंवा तत्सम शाळेत शिक्षीका असतात.
साहजीकच मुलांची संख्या एक किंवा दोन असते.
मुलगी देताना दहा वेळा घर बघून दिलेली असते. ही सोंगटी कटेवर बसली की मुलाचं लग्न .
आताशा सॉफ्टवेर मध्ये असल्यामुळे मुलगा लग्न झाल्यावर बंगळूर किंवा हैद्राबाद येथे असतो.
कुणिच कुणाच्या पायापायात येत नाही.
काका – (काकू घरात नसताना) घर सांभाळतात. काका अकाली यांच्या घरात पोळ्यावाली बाई. झाडू पोछावाली बाई आंटी घरात असतानाच येउन जातात.काका काकूला स्कूटरवरून स्टेशनवर सोडतात आणि परत घ्यायला पण जातात.बजाजची प्रिया किंवा चेतक .काका स्कूटरला फार संभाळून असतात. स्कूटरच्या मेंटेनंस वरून (जाणकार )काका काकूंची किती काळजी घेत असतील याचा अंदाज करू शकतात.
यथाकाल काकांचा हार्नीया किंवा हायड्रोसील कलेकलेने वाढून ऑपरेशनच्या योग्य होतो आणि काकांची प्रिया-चेतक ची साथ सुटते. बजाजची पाठची सिट काकूंना पुरेनाशी होते हे पण एक दुराव्याचं कारण असू शकतं . पण काका निराश होत नाहीत .ते रुंद सिट असलेली कायनेटीक नोव्हा घेतात.
वेळ घालवणे हाच एक दिवसभराचा कार्यक्रम असतो. काका जनरली काय करतात याचा आढावा घेतला तर खालील निरीक्षणे उपयोगी ठरतील.
१ रोज बँकेत जातात. पास बुक भरून घेतात.
२ आपली पत्रं पोस्टात जाउन घेउन येतात.
३ सोसायटीच्या वॉचमन बरोबर गप्पा मारतात.( काही काका वॉचमन कडून मुंबईसंध्या घेउन “ते”चौथे पान वाचतात असेही निदर्शनास आले आहे.)
४ दुपारी जेवणानंतर पोस्टाची प्रमाणपत्रं उलटी सुलटी करून वाचतात.डिव्हीडंड वॉरंटची काउंटर फॉईल पण ऐतीहासीक दस्तावेजासारखी जपून ठेवतात.
५ मॅच चालू असेल तर बॉल टू बॉल मॅच बघतात आणि त्यांच्या ऑफीसातल्या कलीग्जना धोणी शून्यावर आउट झाला असं काहीतरी सांगत राहतात.ते काही वेळानी यांचा फोन घेणं बंद करतात.पण यांना वाईट वाटत नाही.
६…
७…..
निरीक्षकांनी यात भर घालावी.
मुलगी अमेरीकेत असली तर बघायला नको. रोज मेल पाठवतात. सकाळी फोन करून मेल वाचली का म्हणून विचारतात.काकूंबरोबर मुलीच्या बाळंतपणाला अमेरीकेत वगैरे जातात. जावयाचा छळ मांडतात.परत आल्यावर नातवाचे फोटो आणि चॉकलेट-बदाम इत्यादीच्या पुरचुंड्या घेउन गावभर फिरतात.
एकूण सु-काका होणं चागलंच.पण प्रॉब्लेम एकच आहे की खरोखर निवृत्त होण्याची वेळ आली की ज्यूस संपलेल्या टेट्रापॅक सारखे अचानक कोलॅप्स होतात.
————————————————————————————————
होम्ममा काका हा पण अकाली काकांचा एक प्रकार आहे. यांना ओळखणे फार कठीण नाही.
सकाळी साडेअकरानंतर बारा डबा गाडीची वाट बघत स्टेशनच्या शेवटच्या चार बाकावर हे बसलेले असतात.
“ये बारा डबा गयी तो बादमे बारा दस” असं न विचारता अनोळखी माणसाला सांगतात.
बाकड्यावर बाजूला कुणी बसलच तर आवश्यकता नसताना थोडसं सरकून बसतात
यांच्या मोबाईलचा उपयोग फक्त मिस्स्ड कॉल देण्यासाठी वापरतात.
फोन आला तर त्यांना फार आनंद होतो.दहा मिनीटं बोलतात.
दाढी रोज करतात.शर्ट इन करतात.
पण बेल्ट लावत नाहीत.
यांच्या खिशात फारसे पैसे नसतात. शंभराची एक नोट घडी घालून आत कुठेतरी ठेवलेली असते.
इच्छा नसताना कंपलसरी निवृत्त झालेली ही जमात डॉ.सामंतांनी गिरणी कामगारांचा संप यशस्वी केल्यावर मुंबई परीसरात अचानक वाढली. होम्ममा म्हणजे होरपळलेला मध्यमवर्गीय मराठी माणूस.ठाण्यात बंद कंपन्यांनी होम्ममाची संख्या वाढवतच नेली. बघा .वायमन गॉर्डन , एक्सेलो केबल, सिंघानीया हॉस्पीटल,सी.पी टूल्स,शक्ती डायींग,एफजीपी, इंदू फिल्म्स होचेस(हेक्स्ट) .होम्ममाची कमी नाही.
अकाली निवृत्ती आणि त्यानंतरची एखाद दोन फसलेली बिझीनेस वेंचर यांना घरात कायमची राईट ऑफ करतात.
यांची मुलं यांच्याशी बोलताना आठ्या घालूनच बोलतात.बायको नजरेनीच बोलते.
कंपनी गेट वर माजावर आलेल्या सांडासारखी डुरकणारी ही माणसं कंपनी बंद पडल्यावर आपला आत्मविश्वास कायमचा घालवून बसलेली असतात.
आपलं घरातलं अस्तीत्व घरात कसंबसं सांभाळून असतात.दोन टाईम जेवण आणि दोन जोडी कपडा या बेअर मिनीमम गरजेवर जगत असतात.सकाळी चहाची पण मागणी करत नाहीत. बसल्या जागी चुळबुळ करतात.नवाकाळ वाचतात.अग्रलेख वाचून स्वताशीच हसतात.
यांच्या आयुष्याचा कर्तरी प्रयोग संपून कर्मणी प्रयोग सुरु झालेला असतो.
आयुष्याचा दोर हातातून निसटत चालल्याची खंत कायम मनात घर करून असते त्यामुळे घरातसुद्धा चोरट्यासारखी राहतात
आपल्याशी कोणीतरी बोलेल अशी वाट बघतात.
हे आपणहून काही बोलले तर कुणाला ऐकूच येत नाही.
घरात आपला उपद्रव शक्यतो कमी व्हावा असा यांचा प्रयत्न असतो.सकाळची काम संपली की मुंबईला जातात. पाचच्या गाडीनी परत येतात.
लग्न मुंजी या समारंभात घरातर्फे जातात. यांचा दुसरा काही उपयोग नाही हे त्यांना रोज अप्रत्यक्षरित्या घरात सांगीतलं जातं.
सोसायटीत प्रत्येक मर्तीकाला उपस्थीत असतात पण तिरडी बांधायला पुढे होत नाहीत. आपण बांधलेल्या गाठी सुटतील अशी भिती मनात असते. इतका खालावलेला आत्मविश्वास !!!
दसरा दिवाळीला नवीन शर्ट घातल्यावर त्यांना अत्तराची आठवण होते.
हलकेच खूण करून बायको कडून जुनी अत्तराची कुपी मागवतात.अत्तर लावतात.
खरं म्हणजे अत्तर कधीच संपलेलं असतं पण उरलापुरला सुगंध उरल्यासुरल्या दिवसांसाठी पुरेसा असतो
——————————————————————————–

बहुतेक दुसरीच्या वर्गात ही गंमत झाली होती. एका शनीवारी आमच्या वर्गातला एक मुलगा सकाळी आला तेव्हा त्याच्या कपाळावर लाल काळा डाग दिसत होता. कपाळावर मारुती आला म्हणून मिरवत होता. थोडा मस्का मारल्यावर त्यानी रहस्यभेद केला.कपाळावर बोटानी एकशे अकरा वेळा मारुतीचं नाव घेऊन कपाळ घासलं की मारुती येतो. मधल्या सुटीपर्यंत वर्गातल्या बहुतेक कपाळांवर मारुतीराया प्रकटले होते.त्यानंतरच्या रामायणाला सोमवारी सगळे पालक हजर होते. हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे असं की मार्केटमध्ये रोज असा काहीतरी फंडा यायचा. एक कुठलीतरी अफवा यायची मग दिवसभर तेच तेच सारखं एकमेकांना ऐकवायचं.
अशा आवया आणि त्यानुसार गुंतवणूकीचे निर्णय खरं म्हणजे अशास्त्रीय निर्णयाचा कळस.पण त्यावेळी इंटरनेट किंवा संगणक काहीच उपलब्ध नव्हतं .क्लच ऑटोची टिप दर तीन महिन्यानी यायची. क्लचऑटोचा काऊंटर जोरात चालायचा.आदल्या आवईच्या वेळी फसलेले गूंतवणूकदार मोकळे व्हायचे आणि नविन अडकायचे.अशी खबर देणार्‍या माणसाला खबरी म्हणायचे.ब्रोकरच्या किंवा कंपनी डायरेक्टरच्या पुठ्ठ्यातली माणसं फिरत असायची.त्याच्या पाठी लोंबत्यासारखे फिरून छातीठोक बातम्या आणणारी ही माणसं एकच डायलॉग सारखा मारायची.एकच उपदेश करायची घरदार विकून हे शेअर घेऊन टाक.त्यांना घरदार विकणं शक्य नसायचं कारण ते भाड्याच्या घरात रहायचे.या सगळ्या “ढ” क्लासच्या शेअर्सना धारावी म्हणायचे. रींगच्या एका टोकाला धारावी ट्रेडींग करणार्‍यांचा दलालांचा एक वेगळा जथा असायचा.पण धारावी ते ब्ल्यु चीप असा प्रवास करणार्‍या कंपन्या पण बघीतल्या आहेत.मोझर बेअर एके काळची धारावी स्क्रीप.

आता संगणकाच्या युगात ही जमात नाहीशी झालेली नाही .आता हे लोक फक्त टाय लावून सीएनबीसी वर बोलत असतात.

गुंतवणूकीच्या नाना तर्‍हा. काहीजण लो बजेटवाले. ते फक्त दोन -अडीच-साडेतीन रुपयांचे शेअर्स घ्यायचे. एखादा मेगाइश्यु येऊन गेला की या लोकांना भयंकर आसूरी आनंद व्हायचा .सुरुवातीची गरमागरमी संपली की तो शेअर जो पडायचा तो सरळ लो बजेटवाल्यांकडे. मंगलोर पेट्रो केमीकल- जिंदाल विजयनगर कित्येक उदाहरणं.माझ्या ओळखीचे एक बँक मॅनेजर आहेत. त्यांनी जिंदालचे वीस हजार समभाग साडेचार रुपयाच्या हिशोबानी घेतले होते.बघा आजचा भाव काय आहे.असा हिशोब केला तर आतापर्यंत त्यांच्याकडे काही कोटी असायला पाहीजेत पण नाहीय्येत.जिंदालचा भाव बारा रुपये झाल्यावर सगळे शेअर विकून त्यांनी दोन रुपयात मोदी सिमेंट घेतले.
मोदीचं सिमेंट नंतर एव्हढं घट्ट झालं की गुंतवणूकदार अडकूनच पडले.

असे नाना पंथ. नाना जमाती. त्यांचे देव .त्यांचे पुजारी आणि पुजक.

काही मंडळी सकाळपासून मोठ्या ब्रोकरपाठी फिरत असायची.तेव्हांचे मार्केट आयडॉल म्हणजे मनू माणेक .शांती बाळू. जी. एस.दमाणी. घनश्याम बागडी, पल्लव सेठ.(हर्षद मेहेता कंचनलालच्या दुसर्‍या मजल्यावरच्या ऑफीसमध्ये उभा असायचा.मी मार्केटमध्ये आलो तेव्हा त्याच्या बॅंकरप्टीचा दुसरा एपीसोड चालला होता.अजय कान(कलकत्ता)आणि हर्षद मेहेता ही कुस्ती अनिर्णीत होती.)
पण हे सगळं नंतर.
शांती बाळू दुर्योधनासारखा मांडी दाखवत धोतर वर घेउन उभा असायचा. त्याच्याकडे दोन कार्ड होती एक शांती बाळू आणि दुसरं हरीश शांती. शांती बाळू मध्ये फक्त सट्टा. एका हातात धोतराचं टोक. दुसर्‍या हातात इकोलॅकची काळी छोटी ब्रिफकेस.इकोलॅकची बॅग तेव्हा स्टेटस सिंबॉल होतं. त्याच्या पुढे पाठी त्याचे भक्त.फुटपाथवरून हाताची बोटं नाचवत सौदे करायचा.
दुपारच्या वेळी पल्लव सेठ यायचा. आयटीसी बुल त्याचं टोपण नाव. शांती बाळू आणि त्याच्यासारख्या जुन्या स्टाईलच्या ब्रोकरांपेक्षा वेगळीच स्टाईल. पल्लव सेठ सी.ए. असल्यामुळे कार्ड प्रोफेशनल कॅटेगरीमधून मिळालेले. ब्रँडेड शर्टस्, टाय असा वेश. पेरीग्रीन बरोबर टाय अप. त्याला येताना पाह्यलं की शांती बाळूच्या आसपासची माणसं त्याच्यापाठी धावत सुटायची. तो ज्या लिफ्टमध्ये जाईल त्या लिफ्ट मध्ये माणसं घुसायची. एखादा शब्द तरी बोलावा याच्यासाठी वेड्यासारखी त्याच्या चेहेर्‍याकडे बघत रहायची.हर्षद मेहेताबरोबर पल्लव सेठ पण संपला.किशोर जनानी पण संपला.एक दोघंच टि़कले . त्यापैकी एक वल्लभ भन्साळी आणि दुसरा निमिष शहा. एखाद्या कंपनीचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून गुंतवणूक करायचे तंत्र वल्लभ भन्साळीनी आणले.त्यामुळे तेजी-मंदी चा काहीही असर एनॅमवर कधीच पडला नाही.एक आथवण येण्यासारखा बिचार जीव म्हणजे बिमल गांधी. अत्यंत प्रामाणिक.सेसा गोवाचा हाउस ब्रोकर्.त्याच्या सगळ्या ग्राहकांनी आपापली जिंदगी बनवली त्याच्या जीवावर. संगणकाचा उपयोग करणारा पहिला ब्रोकर.
परदेशी कंपन्या आल्यावर फक्त प्रोफेशनल दलाल टिकले बाकी सगळे काळाच्या पडद्याआड गेले.हेमेंद्र कोठारी , महेंद्र कंपाणी .हे सगळे जुन्या पठडीचे सेठ . त्यावेळी सरकारी कर्जरोख्यात सगळेच बनवाबनवी करायचे.ते जे करत होते ते हर्षद मेहेतानी नंतर हजार पट मोठ्या प्रमाणात केलं.*
या दोन्ही कॅटेगरीला पुरून उरला तो मनू माणेक. कच्छी विसा ओसवाल. पैशाची मूर्तीमंत ताकद. मंदीचा बारमाही पुरस्कर्ता.खरंम्हणजे व्याज बदल्याच्या जोरावर बहुतेक दलालांना अंगठ्याखाली दाबून ठेवायचा.टेरर माणूस.
हे सगळे नजारे बघता बघता माझं पहिलं वर्ष आणि बिगीनर्स लक पण संपलं.
————————————————————————————————————————————————
बाजारात गेल्यापासून तिथल्या काही सवयी मला पण चिकटल्या होत्या.
१ घरून जेवूनच बाहेर पडायचं.
२ मार्केट संपल्यावर तिथंच रेंगाळत रहायच.
३ देव ,देवाचा फोटो, देवा ची मूर्ती यांना उठसूट नमस्कार करत रहायचं.
४ मोठ्ठ्यानी पादायला लाजायचं नाही.
५ तोंड बंद न करता समोरच्या माणसाच्या तोंडावर ढेकर द्यायची.
६ संध्याकाळी रस्त्यावर उभं राहून वांझोट्या चर्चा करायच्या.
बरोज वेलकम चा सट्टा करायचं ठरवलं तेव्हा रोज फायनान्सर शोधायची मोहीम सुरु झाली.पहिला फायनान्सर भारत कटलरीवाला जैन. यांचं चांदीच्या भांड्याचं मोठ काम होतं. उपयोगात नसलेले पैसे रास पडलेले असायचे.व्याज बदला फक्त ए ग्रूपच्या शेअरमध्ये ऑफीशिअली अलाउड होता.ज्यांना बी टाईपच्या शेअरमध्ये बदला करायचा असेल त्यांना खाजगी पैसे मिळायचे. व्याज भरमसाट .पण सट्टा सही चालला तर काही फरक पडायचा नाही. त्यांनी साडेसात लाख कबूल केले. आणखी पंधराएक लाख उभे करायचे होतें. नरेंद्र नावाचा एक दलाल मला प्रिया डायकेम नावाच्या कंपनीत पोद्दार चेंबरच्या ऑफीसमध्ये घेऊन गेला. त्याच्या दलाली पद्धतीने पार्टीविषयी भरपूर माहिती दिली होती. दुपारी चार वाजता मी, नरेंद्र आणि माझा सी.ए. मित्र ऑफीसला पोहचलो. फायनान्सर (त्यांना बाबूजी म्हणायचे) त्यांच्या केबीनमध्ये नव्हते. त्यांच्या पीएनी आत बसायला सांगीतलं. पाच मिनीटानी बाबूजी आत आले. त्यांनी धोतर लुंगीसारखं गुंडाळलं होतं. नमश्कार असं म्हणून आम्हाला वळसा घालून त्यांच्या खुर्चीत बसायला गेले. ते कुठून आले होते हे सांगायला नको होतं .मागच्या बाजूला धोतर ओलं होउन ठिकठिकाणी चिपकलं होतं.खुर्चीत बसून एक लांबलचक ढेकर देऊन म्हणाले
“बोलो मालीक. कितना रोकडा चाहीये?
चाय ला रे.”
चहा आला.
मी म्हटलं “पंधरा लाख.”
सट्टा कौनसे आयटम मे करोगे . परत ढेकर.दुपारी कांदा खाल्ला असावा.
“कितने दिन के लिये?”
“त्रण महीना . “नरेंद्रनी उत्तर दिलं.
आता बाबूजींनी समोरच्या फायलीतून काहीतरी शोधायला सुरुवात केली. आम्ही आदल्या दिवशी आमची फाईल पाठवली होती.
आमच्या अपेक्षा वाढल्या. इथं काम झालं असतं तर आणखी फिरायची आवश्यकता नव्हती.
“हमारा अंदाज से तुमको जादा पैसा लगेगा. “बाबूजी म्हणाले.
फायलीच्या गट्ठ्यातली शोधाशोध चालूच.
“अगर फाईल नही मिलता है तो दुसरा…..”
असं म्हणेपर्यंत बाबूजींना हवी असलेली वस्तू सापडली.
गठ्ठ्याखालून त्यांची चड्डी बाहेर काढली.
इलास्टीक चेक केलं . एकदा उलटीसुलटी केली,उभे राहिले. साटकन आवाज करत चड्डी घातली.
“बोलो अभी बोलो.”त्यांच्या चेहेर्‍यावर एक सात्वीक समाधान झळकायला लागलं
काय कप्पाळ बोलणार. माझ्या नाकातून चहा बाहेर येत होणार होता.
व्याजाची बोलणी सुरु झाली.
मध्येच बाबूजींच्या चेहेर्‍यावर एक त्रासीक भाव आला.
माझ्या मनात आलं “आता काय?”
काही नाही.बाबूजी खुर्चीत ज..र्रा अपीश झाले आणि ट्रँव ट्रँव करून दिर्घ पादले.
“चलो आगे बोलो.”
त्या दिवशी जे हसू दाबण्यासाठी प्रचंड प्रयत्न करायला लागले त्याची तुलना कशालाच नाही.
नरेंद्र सारखा म्हणत होता इतना हसनेका क्यु?
बाबूजीने जराक गेसनी तकलीफ छे.

खरं म्हणजे ह्या आठवणींचा उपयोग एकच.
आता पोटात काही नसताना हा किस्सा आठवून हसायला बरं पडतं. दोन मिनीटं भूक पोटाला कमी कुरतडते.
बाकी शेअरबाजारच्या या आठवणी म्हणजे विधवेनी आपल्याच लग्नाचा आल्बम चाळत बसण्यासारखं आहे.
———————————————————————————————-

चौदा ऑगस्ट १९९६. मी जीजीभाई टॉवर्सची पायरी खाली उतरलो.सोबत एक जुना मित्र होता.
सो, पती गयु? त्यानी विचारलं.
येस. नो रीग्रेट्स.मी उत्तर दिलं.
वो बेड डिलीवरी का क्या करेगा? त्यानी सहज विचारलं असावं.
राईट ऑफ किया है.तेरेको चाहीये तो लेके जा.सुधार ले.बेच डाल.मी उत्तर दिलं.
बिचारा काहीच बोलला नाही. आम्ही वळून युनीयन बँकेकडे आलो होतो.
सेंडविच खायेगा?कलसे तो तू नही आनेवाला.
चल खा लेते है.
रात्री घरी जायचं की नाही हा पण विचार केला नव्हता.मनात प्रचंड हलकल्लोळ माजला होता.आज दुपारी बसून ब्रोकरचा हिशोब संपवला होता. चेक जेमतेम पस्तीस हजाराचा आणि बॅड डिलीव्हरीचा गठ्ठा हातात होता. पुढे काय? काहीही ठरलं नव्हतं.दलाल स्ट्रीटवर आलेला माणूस इथेच कायम राहतो.सौदा असू दे वा नसू दे. उन ,पाऊस, वारा, बंद ,दंगल ,जयंती , श्राद्ध, काहीही असू दे पाय इथून हलता हलत नाही.
संध्याकाळी स्टॉकमधला शेवटचा पतंग कटल्यानंतर हातात मांज्याचा गुंता आणि रिकामी फिरकी घेउन घरी जाताना खरचटलेले गुडखे जास्तच चुरचूरून दुखायला लागतात तसं काहीसं वाटत होतं.डोळ्यांच्या कडा जळजळायला लागतात ताप आल्यासारखं वाटायला लागतं .लक्षणं तशीच होती सगळी पण हा खेळ नव्हता.उद्या परत नविन पतंग मिळणार नव्हता.
परमेशाच्या स्टॉलवर आलो. सेंडविच खायेंगे .वोल्गा का पान खायेंगे.तेरेको आज फेअरवेल पार्टी.माझा मित्र म्हणाला.
वाक्य संपता संपता तो रडायला लागला.पोस्टाच्या पायरीवर बसून अम्ही दोघही मनमोकळं रडलो.
स्साला ,तू स्पॉटका काम नही करना चाहिये था. अच्छा एनालीस्ट है.इलीयट तूच सिखाया ना जयंतीभाईको?
अब ये सोचके क्या फायदा. दिवालीया तो बोल दिया ना वो. सौदा तो कभी नही लिखना नही है.असं म्हणता म्हणता मी परत एकदा रडायला लागलो.
जाने दे आगेका क्या सोचा है.त्यानी विचारलं.
कुछ नही. थोडी मूडी है. देखो क्या होता है.
सँडविच संपवून आम्ही निघालोच.
वोल्गा का पान?
नही. अब वोल्गा को भूलना है.
मै आता हूं व्हीटीतक .
नही यार तू जा. मी जवळ जवळ ओरडलोच.बिचारा रडवेला झाला.
मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला समजावलं .
लेकीन तू सिध्धा घर जायेगा ना? त्यानी विचारलं.
हा बाबा . एव्हढं बोलून निघालोच.
गाडीत बसल्यावर मनु मंगळचा एक जॉबर दिसला. गाडी सोडून दिली.कुर्ला गाडी पकडली.विंडो जवळ बसून विचार करायला लागलो.
१९८२ साली या मार्केटमध्ये आलो तेव्हा जे हातात होतं तेव्हढंच आज हातात होतं.म्हणजे काहीच नव्हतं.
आलो नाही गेलो नाही. मध्यंतरी झाले ते सगळे भास.
———————————————————————————————-माझा पहिला ब्रोकर बिपीन देवाणी. माझ्या मित्राचा मोठा भाऊ.तेव्हा सब ब्रोकरला पण ब्रोकरचा मान होता.एका ब्रोकरला सहा बेच(बॅच) मिळायचे.माझ्या मित्रानी माझी ओळख करून दिली.
तुम्हारा बेंक अकाउंट है क्या? पहिला प्रश्न.
हा. है ना. मी माझं पासबुक काढून दाखवलं.पेण अर्बन कोऑपरेटीव बँकेचं पासबुक पाहिल्यावर तो पण गडबडला.पंकज राच नावाचा त्याचा पार्टनर होता.
त्यानी सांगीतलं ये नही चलेगा. बेंक ओफ इंडीया का खाता चाहिये.
त्यानी माझ्या मित्राकडे पाह्यलं.माझ्याकडे पाह्यलं.हताश मुद्रा करून म्हणाला
बोलो कौनसा शॅर लेनेका है?
मी यादी काढली.
एशीयन हॉटेल पाचसो शेअर लेनेका है.
सूं भाव छे.
बारा रुपया पचास पैसा.
केश मा छे.
मी खिशातून पैसे काढून दाखवले.
देखो केश है.
आ घाटीने क्यांथी ले आयवो? माझ्या मित्राला त्यानी विचारलं.
मला राग आला होता. मी म्हटलं मै घाटी नही.ब्राम्हण है.त्याच्यावर काही फरक पडलेला दिसला नाही.
इ बद्धो एकच असं काहीतरी तो म्हणाला.पहिला सौदा लिहीताना त्यानी कंडीशन घातल्या होत्या. दलाली दो टक्का.
मेरा काम तारवणी का है.तारवणी म्हणजे जॉबींग.एका ब्रोकरला सहा बेच(बॅच) मिळायचे.
छोटा सौदा नही मिला तो रोनेका नही.
कन्फर्मेसन शामको मिलेगा.चेक तभीच तयार चाहिये.
वायदेका सौदा नही लिखूंगा. माना हलवत सगळ्या अटी मान्य केल्या होत्या.नेहेमी घ्यायला गेलं तर त्या दिवशीचा हाय्येस्ट भाव. विकायला गेलं तर लोएस्ट भाव. हुज्जतघालायचा प्रश्नच नाही. सौदा बंद.
आताचे दलालीचे दर बघताना कळतं ब्रोकर किती पिळत होता. भावफरक आणि दोन टक्के.
मी राग गिळला. महाराष्टीयन ब्रोकर एक दोनच.आगाशे आणि नाबर.नाबर आणि कंपनी. तिथे जाऊन प्रयत्न करून आलो होतो.पण तिथे नाबर कोणी नव्हताच. सगळेच सुरेस, रमेस ,राजेस आणि सिनीअर सगळे कांतीकाका किंवा कानजीभाई.मराठी माणसाकडे फारच संशयानी बघायला लागायचे.(कदाचीत माझा चेहेरा असेल तसा.)
पण मी घाटी हा सल कायमचा मनात राहीला.हा राग प्रचंड होता .मार्केट सोडेस्तोवर मी कुठल्याच ब्रोकरला भाई म्हणून हाक मारली नाही.
एशियन हॉटेल कम डिवीडंड होता हे मला माहिती नव्हतं.शाळेत शिकलेला समभाग आणि कर्जरोखे हा धडा इतकचं ज्ञान.दोन दिवसानी बिपीन कडे गेलो तेव्हा मला बघून म्हणाला अगले पतावट मे डिलीव्हरी आयेगा. अभी चेक दे दो.फायदा है .देड रुपया डिवीडंड का.और भाव भी बढ गया.भाव साडेपंधरा रुपये झाला होता.
आता हळूहळू दलाल स्ट्रीटचा कारभार समजायला लागला होता. मी फारच वेगानी एकेक गोष्ट शिकत गेलो.हातात ब्लॉक घेऊन ,कोट घालून तो कधी येतो याची वाट दुसर्‍या मजल्यावरच्या जिन्यावर आम्ही थांबायचो.आपला ब्रोकर दिसला की धावत जाउन ऑर्डर हातात द्यायची. ह्या बाबाचं तोंड पानानी गच्च भरलेलं असायचं.
इतना सौदा लिखनेका टाईम नही है आज.अशीसगळी मग्रूरी ऐकायची आणि शक्य तेव्हढे सौदे पदरात पाडून घ्यायचे
एशियन होटेल नंतर अल्कील अमाइन , ग्रिंडवेल नॉर्टन, सगळे पेनी शेअर्स. सहा सात महिन्यानी पन्नास साठटक्के भाव वाढले.
बिपीन पंकज आता मला विचारायला लागले होते क्या ध्यान लगता है?
आमच्या घरी मात्र फार कौतुक . पोस्टात पैसे ठेवणं आणि अडीअडचणीला काढणं या पलीकडे माहिती नाही.पोस्टातून रंगीबेरंगी ऍन्युअल रीपोर्ट यायला लागल्यापासून भाव सॉलीड वधारला होता.
कायनेटीक होंडाच्या इश्यु नंतर मात्र एका नविन वळणाला सुरुवात झाली.सिटी बँकेपासून बद्रीमहल पर्यंत रांग होती इश्युचे फॉर्म भरायला.माझ्यासारखे मध्यमवर्गीय बाजारात यायला सुरुवात झाली होती.
———————————————————————————————-
एकदा दुपारी मार्कॅटमध्ये संतोष रत्नाकर भेटला. भाऊ, इकडे कुठे?
तू काय करतोयस इथे ते सांग.
व्ही.डी. सोंडे नावाचे इन्कम टॅक्स कमीशनर मार्केटचे एम.डी झाले होते.संतोष त्यांच्या ओळखीनी बोर्डात (शेअरबाजार चालवणारी संस्था) लागला होता.त्याच्याबरोबर वर सत्ताविसाव्या माळ्यावर गेलो.साहेबांशी ओळख झाली.बोर्डात ९०%माणसं मराठी. बाकी गुजराती. नोटीस इंग्रजीसोबत गुजरातीत पण इश्यु व्हायच्या म्हणून .
आता लक्षात आलं बोर्ड आणि बाजार गुजराथी आणि मारवाडी व्यापार्‍यांचा. नोकर सगळे मराठी. मराठी म्हणजे घाटी .घाटी म्हणजे नोकर असं समीकरण .
तायशेट्ये नावाचे गृहस्थ एक हाती सत्ताविस माळ्याची देखरेख बघायचे.ते मला म्हणाले बघा बरं संभाळून रहा. आपण पैशानी कमी पडतो या लोकांपुढे.लुबाडले जाल बरं.
थोड्या वेळानी म्हणाले ,
असं का करत नाही. दुसर्‍या मजल्यावर कापली रूम च्या बाजूला एक कँटीन करायचा बोर्डाचा विचार आहे. तुम्ही ते चालवा.
मी नाही म्हणालो पण आज वाटत होतं तेच करायला पाहिजे होतं.

Hello world!

ऑगस्ट 30, 2008

Welcome to WordPress.com. This is your first post. Edit or delete it and start blogging!